पिंपरी: रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने दिला जाणारा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कामगारनेते दत्ता धामनस्कर, विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या आरुष ट्रस्टच्या संचालिका वृषाली गंधे,किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य,एचआयव्ही रुग्णासाठी कार्य करणाऱ्या डॉ मधू ओसवाल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल मेहुल परमार, क्लबचे अध्यक्ष हरबिंदर सिंग,सचिव शशांक फडके,कमलजित कौर, गौतम दोशी आदी उपस्थित होते.
यावेळी परमार म्हणाले कि, समाजात बरेचजण आपापल्या परिने सेवा करीत असतात.त्यातही सामन्यात असमान्यांचा गौरव होतो. जे आयुष्यात परिवर्तन घडून आणतात ते यशस्वी होतात. दुसऱ्यांसाठी जगणे यालाच जीना इसीका नाम है. यावेळी अध्यक्ष सिंग यांनी पुरस्कारप्राप्तीना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. गौतम दोशी यांनी केले.
प्रास्ताविक कमलजीत कौर सूत्रसंचालन दोशी यांनी तर आभार नियोजित अध्यक्ष सुहास ढमाले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.