पुणे | प्रतिनिधी
पुणे : खेड मधील नगरपरिषद कार्यालयात लेखापाल यांच्याकडून लाज मागण्या व घेण्या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
चारूबला राजेंद्र हरडे (वय 31) अभियंता आरोग्य विभाग, प्रवीण गणपत कापसे (वय 35) लेखापाल नगरपरिषद खेड, श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय 35) मुख्याधिकारी राजगुरुनगर नगरपरिषद असे आरोपीचे नावे असून, तक्रारदाराने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून, त्यांना राजगुरुनगर नगरपरिषद खेड येथील आरोग्य विभाग याकरिता लागणारे साहित्य पुरवले होते. त्याचे एकूण 80730 रुपयाचे बिल त्यांनी नगरपरिषद राजगुरू येथे सादर केले होते नमूद बिल काढून देण्याकरता लोकसेवक हरडे यांनी ८ हजार रुपयांची लाचेची मागणी पंचकम करून ८ हजार रुपये स्वीकारले. लोकसेवक प्रवीण कापसे, लोकसेवक श्रीकांत लाळगें यांनी हरडे यांना सदर लाच स्विकरण्याकरिता प्रोत्साहन दिले. यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध 1988 अधिनियम कलम 7,12 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक श्री प्रवीण निंबाळकर, पोलीस निरीक्षक रुपेश जाधव, म.पो.ना. शिल्पा तुपे, पो. शि. आशिष डावकर, चालक पो. शि. माळी, मार्गदर्शक अधिकारी शितल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांनी केले.
तसेच सर्व नागरिकांना पोलिसांकडून आव्हान करण्यात आले आहे, कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यासाठी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
नितीन जाधव पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे. मोबाईल क्रमांक 9923046855












