उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. आज अजित पवारांनी इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. यावेळी लोकसभेत महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणा आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा खासदार बवू या, असे आवाहन इंदापूरकरांना केले आहे.
अजित पवार म्हणाले, मी आज इंदापूरमध्ये आलो आहे. कारण मला घरातून प्रचाराला सुरुवात करून राज्यभर प्रचाराला बाहेर पडायचे आहे. लोकसभेत महायुतीचे जास्तीत जास्त खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. एनडीएमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी मोदींच्या विचाराचा एक एक खासदार निवडून आला पाहिजे माझी सुरुवाती आणि आताची कारकीर्द तुम्ही पाहिले तर साधारण: राज्याचा सर्वांगिण विकास व्हावा