पुणे | प्रतिनिधी
भोसरी, दि.२० : भोसरीच्या एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.भोसरीत एक महिला गरोदर असल्याचे माहित असूनही तिच्यासोबत अतिप्रसंग करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
अक्षय संजय कांबळे [ वय २३, रा.गट नं ८१, वाघेश्वर कॉलनी नं १, बोऱ्हाडेवाडी मोशी ] असे आरोपीचे नाव आहे.पीडित महिला ही गरोदर आहे हे माहित असूनही आरोपीने महिलेला तिच्या नवऱ्याला मारण्याची धमकी देत मारहाण केली.तसेच तिच्या सोबत वारंवार तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपीवर भादंवि कलम ३७६ [ २ ] [ एच ] [ एन ],३७७,५०६,३२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.












