पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. ११ : अखेर १७ महिन्यानंतर हायकोर्टाने नवाब मलिक यांना दिलासा दिला आहे. आजारपणाच्या कारणामुळे त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.
नवाब मलिक हे गेल्या १७ महिन्यांपासून मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईमधील कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. याआधी ही त्यांनी आजारपणाच्या कारणामुळे जामिनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने अर्ज फेटाळून लावला होता.
नवाब मलिक यांना किडनीचा विकार असून यामध्ये त्यांची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. त्यांची प्रकृती ही ढासळली असून ते एकाच किडनीवर जगत आहेत. त्यांच्यावर मुंबईमधील क्रिटी केअर रुग्णालय कुर्ला येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्याच्या कारणावरून हायकोर्टाने त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
सध्या देशात राष्ट्रवादी गट फुटीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आल्यानंतर नक्की कोणत्या गटात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नवाब मलिक यांचे गँगस्टर डाऊद सोबत संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. अशा परिस्थितीत शरद पवार किंवा अजित पवार हे नवाब मलिक यांना आपल्या गटात प्रवेश देतील का असा प्रश्न उपस्थित राहतो. जर का नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला तर भाजपा आणि शिंदे गट यांची यावर काय भूमिका असेल हे एक कोडेच आहे












