महाराष्ट्र: महाराष्ट्रच्या नव्या सरकारची शपथविधी ५ डिसेंबरला होणार आहे. या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाच्या चर्चेवरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा देखील रंगली आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का? याबाबत आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
आज माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “आम्ही त्यांना पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांना सलाईन लावली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ५ तारखेच्या शपथविधीला जायचे की नाही हे डॉक्टरच ठरवू शकतील. आम्ही सर्व आमदार एकत्रितपणे याबाबत निर्णय घेणार आहोत.
सोबतच ते म्हणाले कि एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार नाही. सत्ता त्यांना महत्त्वाची नाही. सत्तेसाठी सोंग ढोंग करणे गरजेचे नाही. परिस्थिती जटील आहे. पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. पक्षाचा निर्णय कोणी घेऊ शकणार नाही. आम्ही सर्वजण जाऊ तेव्हा आम्हाला सर्व परिस्थिती कळेल.