पुणे प्रतिनिधी
पुणे दि. ११ : नशा भागवण्यासाठी पहाटेच्या वेळी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला युनिट – १ कडून अटक करण्यात आले आहे. रैय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख (वय २० रा.मीठानगर, कोंढवा-खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या कडून ३२ मोबाईल व १ दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोमवार पेठेतील हिरा सदन बिल्डिंग येथे एका अज्ञात व्यक्तीने उघड्या जारवाजातून आत प्रवेश करत चार मोबाईल व रोख रक्कम चोरल्याची घटना (दि.३) घडली होती. या प्रकारणी समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते.
सदर आरोपी त्रिकोणी गार्डन, भवानी पेठत येणार असून त्याच्या जवळ सॅकबॅग आहे. अशी गुप्त बातमी युनिट एक मधील पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सॅकबॅगत ३२ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट सापडले. वेगवेगळ्या ठिकाणाहून घराचे उघडे दरवाजे, खिडकी तसेच पायी जाणाऱ्या लोकांकडून मोबाईल हिरावून चोरल्याचे कबूल केले. व मोबाईल चोरीसाठी दुचाकी देखील चोरी केल्याचे सांगितले.
सदर आरोपी कोंढवा पोलीस स्थानकातील सराईत आरोपी असून रात्रीच्या वेळी बिल्डिंग खालच्या पार्क केलेल्या दुचाकी चोरून परिसरात फिरायचा. व पुन्हा त्याच बिल्डिंग मध्ये दुचाकी पार्क होता. सदर आरोपीने खडक, समर्थ, फरासखाना, कोंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत जुलै २०२३ ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान चोरी केली आहे. आता पर्यंत आरोपीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपाससाठी समर्थ पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्ता रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे एक सुनील तांबे मार्गदर्शनाखाली युनिटेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद, सह पोलीस निरीक्षक कवठेकर,पोलीस निरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, अण्णा माने, अभिनव लडकत, शुभम देसाई, अजय थोरात, अमोल पवार, शशिकांत देरेकर यांनी केले आहे.












