पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातील संशोधक विद्यार्थी जयकर गायकवाड आणि शीतल जोरी यांच्या द्वारा अनुवादीत शून्यवादाचे जनक ‘नागार्जुनकृत मूलमध्यमककारिका’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा प्रकाशन सोहळा दि. १९ रोजी सायंकाळी ५:३० वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याठिकाणी पार पडणार आहे. सदर पुस्तक प्रकाशन सोहळा डॉ. विजय खरे आणि डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश देवकर उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. विलास आढाव, श्रीकांत बहुलकर , डॉ. प्रदीप गोखले, डॉ. अंजली कुरणे यांची प्रमुख उपस्थिती तर ग्रंथ समीक्षक म्हणून डॉ राजाभाऊ भैलुमे आणि डॉ. धनंजय लोखंडे उपस्थित असणार आहेत. या ग्रंथाचे प्रकाशन गोंदण पब्लिकेशन द्वारे केले जात आहे. या पुस्तक प्रकाशन प्रसंगी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जयकर गायकवाड यांनी केले आहे.