जुन्नर: नारायणगाव पोलीस व दक्षयानी सर्व्हिस या कामपीने नारायणगाव येथील हर्षाली कृषी उद्योग या दुकानात छापा टाकून गोदरेज कामपीनेचे बनावट कृषी औषध जप्त केले आहे.
याबाबत हकीकत अशी कि दक्षयानी सर्व्हिस या कामपीनेचे कर्मचारी मधुकर मुरलीधर आमराव यांना माहिती मिळाली होती कि नारायणगाव येथील हर्षाली कृषी उद्योग या दुकानात गोदरेज कामपीनेचे सुपर शक्ती कम्बाईन या औषधाचे हुबहू नकल करून बनावट औषध करून विक्री केली जात आहे. मधुकर आमराव हे मागील १० वर्षांपासून दक्षयानी सर्व्हिस या कंपनीमध्ये काम करत असून गोदरेज या कंपनीचे उत्पादन ट्रेडमार्क व कॉपरेटचे उल्लंघन व बनावट उत्पादन करून असून मालाची कोणी विक्री करत असल्यास त्याचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे हाक गोदरेज कंपनीने दक्षयानी सर्व्हिस यांना दिला आहे त्या अनुषंगाने मधुकर आमराव यांनी मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी एक पथक तयार करून हर्षाली कृषी उद्योग या दुकानात छापा मारला असता त्याठिकाणी त्यांना सुपर शक्ती काॅम्बाईन या नावाचे ५०० मि.ली. चे प्रत्येकी २००० रु किमतीचे तीन बॉटल आढळून आले. पोलिसांनी कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडे असलेले कंपनीचे ओरिजनल बॉटल व हर्षाली कृषी उद्योग या दुकानात मिळालेल्या बॉटलची बारकाईने पाहणी केली असता बॉटल वरील छपाई, कंपनीचे लोगो, किंमत व दर्जा यामध्ये विसंगती असल्याचे यांना कळाले. त्याचप्रमाणे सदर दुकानदाराकडे गोदरेज कंपनीचे औषध विक्री करण्याचा परवाना देखील नव्हता. पोलिसांनी मिळालेला बनावट माल ताब्यात घेत दुकान मालक तानाजी आरोटे वय ४३ रा. नारायणगाव, याच्या विरोधात कॉपरेट उल्लंघन कायदा कलम ५१ व ६३ प्रमाणे गुन्हा नोंद कात कारवाई केली असून नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक पाटील हे पुढील तपस करीत आहेत.