पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१२ : निगडी परिसरातील ओटास्कीम येथे बुधवार दिं. ११ रोजी रात्रीच्या वेळी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आकाश दूनधव (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ओटास्कीम येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना झाले आहेत.
मयत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.












