पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.२६ : निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर २२ येथील एकाचा खून व एकाला जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता ही घटना ताजी असताना एका ३५ वर्षीय व्यवसायाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकार पुन्हा निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळभोर नगर येथे घडला आहे.
ही घटना दिनांक २५ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास खंडोबा माळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी उमेश कुमार गोरख गुप्ता यांचे या रोडवर बजाज कंपनीचे कंपाउंड भिंतीलगत असलेल्या फुटपाथ वर रिक्षाचे हुड बसवण्याचा व्यवसाय आहे, त्यांच्या शेजारीच प्रशांत मिरजे याचाही तोच व्यवसाय आहे, उमेश गुप्ता याच्यामुळे प्रशांत मिरजे याचा व्यवसाय चालत नाही या व्यवसायिक कारणावरून प्रशांत याने उमेशला दि. २५ रोजी धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार केले.
यामध्ये उमेश याला गंभीर दुखापत झाली असून या संदर्भात उमेशच्या साक्षीवरून वरून निगडी पोलीस स्टेशन मध्ये भा. दं. वी. कलम ३०७, ४२७, ५०४, ५०६, आर्म ॲक्ट ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ३ व ७, महाराष्ट्र पो. अधि. कलम ३७(१),(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे पो.उप. नि. ओमासे करत आहे.












