निगडी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी प्रभावी उपाय योजना राबून मोटरसायकल चोरीच्या गुन्हेंना आळा घालण्याबाबत व गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते या आदेशाच्या अनुषंगाने निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघन माळी, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी गुन्हा करण्यासाठी येतानाचे व गुन्हा केल्यानंतर जातानाचे असे २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर गुन्हा केलेल्या दोन संशयित आरोपींबद्दल त्यांना माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस हवालदार दत्ता शिंदे, पोलीस शिपाई सुनील पवार व प्रवीण कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून संशयित आरोपी राम उर्फ कविराज ज्ञानोबा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्याने व त्याच्या साथीदार अविनाश होळंबे दोघे रा. जिल्हा परभणी यांनी सदरचा गुन्हा व इतर अनेक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावेळी या दोघांनी चोरी केलेले काही मोटरसायकल ह्या गावी नेण्यासाठी चिखली परिसरात एका पडीक जागेत लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणावरून पंधरा मोटार सायकल जप्त करण्यात आला आहे तसेच काही मोटरसायकल या त्यांच्या मूळ गावी व परिसरात विक्री केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी अविनाश होळंबे याचा शोध घेणे कामी व वाहने जप्त करणे कामी पोलीस हवालदार भगवान नागरगोजे, पोलीस नाईक तुषार गेंजगे, पोलीस शिपाई विनायक मराठे व दीपक पिसे असे पथक रवाना झाले असता अविनाश यास ताब्यात घेऊन त्यात दोघांनी चोरीचे वाहने, विक्री केलेल्या दोन एजंटला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे आरोपींना अटक झाल्याची बातमी त्यांच्या मूळ गाव परिसरात कळल्याने अनेक लोकांनी विकत घेतलेल्या चोरीच्या दहा मोटरसायकल सदर आरोपींच्या घराबाहेर बेवारस आणून सोडल्या होत्या त्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सदर दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून हे काही काळ चिखली परिसरात वास्तव्यास होते दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या डुबलीकेट चावीने जा मोटरसायकल ला ती डुप्लिकेट चावी बसेल ती मोटरसायकल चोरी करून त्या गाड्या निर्जनस्थळी लपवून मागणीप्रमाणे गावाकडे नेऊन विक्री करून पुन्हा पुण्यात येऊन फॅब्रिकेशन चे काम हे दोघी करत होते. त्याचप्रमाणे गावी येताना जाताना लागणाऱ्या भागातून सुद्धा ते मोटर सायकल चोरी करत होते. या आरोपींकडून एकूण १७ लाख ५० हजार रुपये किमती ३६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून यांच्या विरोधात असलेले २७ गुन्हे निगडी पोलिसांनी उघडकीस आणले आहे.