ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यापुढे पदभार सांभाळणार
पुणे | प्रतिनिधी
मुंबई, दि. २८ : नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डवरील कार्यकारी संचालक पदावरून पायउतार झाल्या आहेत. त्यांच्या पश्चात ईशा, आकाश आणि अनंत अंबानी हे यापुढेvरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डावर बिगर कार्यकारी संचालक पद सांभाळणार आहेत.
जरी नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळातून निवृत्त झाल्या असल्या तरी त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
आरआयएलच्या संचालक मंडळाने इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेसाठी भागधारकांकडे शिफारस केली आहे. कंपनीचे संचालक आणि भागधारक यांच्या निर्णयानंतर त्यांची नियुक्ती त्यांनी पदभार त्यांना सोपविण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे.
नीता अंबानी या आरआयएल बोर्डाच्या सर्व बैठकांना कायम निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे काही वर्षांपासून आरआयएलच्या प्रमुख व्यवसायांशी जवळून गुंतलेले आहेत आणि त्याचे कामकाज पाहत आहेत. त्यांनी रिलायन्सच्या मुख्य उपकंपन्यांच्या संचालक मंडळावर काम केले आहे.
त्यांची आरआयएलच्या बोर्डावर नियुक्ती आरआयएलला फायदा मिळवण्यास आणि नवीन कल्पनांना प्रेरित करण्यास सक्षम ठरेल,” असे बोर्डाने सांगितले आहे.












