पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २८ : पुणे जिल्हा रुग्णालय आणि पुणे जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यांचे वतीने २५ ऑगस्ट रोजी नेत्रदान पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे आणि जिल्हा नेत्र
शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, तसेच डॉ.बोस, ग्लोबल आय फाउंडेशन पिंपळे सौदागरचे डॉ बी.सी डोळस, डॉ.घोष व अधिकारी कर्मचारी व नेत्र रुग्ण उपस्थित होते.

नेत्रदानाची जास्तीत जास्त जनजागृती करावी. ज्यामुळे अंध व्यक्तीच्या अंधारमय जीवनात बुबूळ
प्रत्यारोपणामुळे प्रकाश यावा, असे आवाहन डॉ.वर्षा डोईफोडे यांनी केले. डॉ. अंजली कुलकर्णीयांनी नेत्रदान व नेत्रदान गैरसमज बाबत माहिती दिली.
तर डॉ. बबन डोळस यांनी नेत्रदानाचे महत्त्व व उपयुक्तता यासंबंधी माहिती दिली. डॉ. हेमंत यांनी नेत्रदान संकल्पाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. वैद्यकीय अधिकारी सहाय्य यांनी प्रास्ताविक, तर डॉ. प्रज्ञा निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचेयशस्वीरीत्या आयोजन जिल्हा नेत्र समन्वय अधिकारी एस. जी. राठोड आणि नेत्रदान समुपदेशक सीमा हगवणे यांनी विशेष प्रयत्न केले.












