पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आणि दैनिक राज्य लोकतंत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस विविध क्षेत्रातील महिलांच्या व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले आहे.
काल या व्याख्यान सत्राचा तिसरा दिवस होता.पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे दि. 17 रोजी दुपारी 2 वाजता एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.ॲड. सविता तोडकर यांच्या आजची स्त्री ह्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ॲड.मोनिका गाढवे, ॲड.ऐश्वर्या शिरसाठ, ॲड. संगीता कुसाळकर, ॲड. विद्याराणी भुजबळ, ॲड.रुपाली पवार, ॲड. रुपाली मोरे, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. पुजा, ॲड. प्रतिक्षा जाधव, ॲड.मानसी उदाली, ॲड. गीतांजली जाधव, ॲड.सोनाली गुंजाळ, ॲड. तृप्ती नखाते आदी उपस्थित होत्या.
ॲड. सविता तोडकर यांनी यावेळी आपल्या भोवताली असणाऱ्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणे सांगितली. पूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री याचे महत्त्व देखील त्यांनी यावेळी पटवून दिले.
आजची स्त्री सक्षम आहे. ती स्वतःच्या न्यायासाठी, हक्कांसाठी लढत आहे. शिक्षणामुळे तिच्यातील धडाडीपणामुळे ती खूप पुढे गेली आहे. सर्व क्षेत्रात ती अग्रेसर बनली आहे असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या सध्या समाजात स्त्रीने तिचे श्रेष्ठ स्थान निर्माण केले आहे. वाढती कुटुंब व्यवस्था वाढते डीवोर्स कल्चर यामुळे लग्न पद्धती सुद्धा बदलताना दिसत आहे. ती आई, बहीण,बायको,मुलगी,मैत्रीण सगळ्या भूमिका अगदी चोख निभावताना दिसते.अनेक क्षेत्रात काम करत असताना तिला घर देखील सांभाळावे लागते.
या व्याख्याना दरम्यान अनेक वकील बंधू आणि भगिनींनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांच्या शंकेचे निरसन करीत उत्तरे दिली.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या उपाध्यक्षा सौ. जयश्री विलास कुटे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.












