पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०५ : या वर्षीचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचा जन्म १९५९ मध्ये नॉर्वे येथे झाला. नॉर्वेजियन निनॉर्स्क या भाषेत त्यांनी साहित्य लिहिले आहे. तसेच विविध शैलींमध्ये त्यांनी बरीच वेगवेगळी नाटके, कादंबरी, कविता संग्रह, निबंध, मुलांची पुस्तके आणि अनुवाद या सर्वांचा समावेश त्यांच्या साहित्यात दिसून येतो.
त्यामध्ये अनेक कथा नाटके, कादंबरी, कविता संग्रह, निबंध यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचे लिखाण उपहासात्मक शैलीतील असून त्यांची हीच शैली पुढे ‘फॉस मिनिमलिझम’ या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांची दुसरी कांदबरी ‘स्टेंज्ड गिटार’ जी १९८५ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. ‘स्टेंज्ड गिटार या कांदबरीत त्यांच्या शैलीची जाणीव होते.












