पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : भारतीय निवडणूक आयोगानं दि.९ रोजी राजस्थान, मध्य प्रदेश , मिझोराम , छत्तीसगड आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत .
छत्तीसगड वगळता इतर सर्व राज्यांतील निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. छत्तीसगडमध्ये मात्र दोन टप्प्यांत मतदान होईल. ७ तारखेला मिझोराममध्ये मतदान होईल,छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला मतदान होईल . मध्य प्रदेश विधानसभेसाठी १७ नोव्हेंबरला तर राजस्थानसाठी २३ नोव्हेंबरला निवडणुका होतील . सर्वात शेवटी तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
सर्व राज्यांत मतमोजणी ३ डिसेंबर रोजी पार पडेल . पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.












