तरूणी तिच्या राहत्या घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढून ते तिच्या घरच्यांना तसेच प्रियेकरला आणि सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ सुभाषचंद्र गुप्ता (वय ३०, रा. सी.जी.एच.एस. शासकिय क्वॉटर्स, मुकुंदनगर, पुणे) असा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरूणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान पिडीत तरूणी घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढले. ते तिच्या घरच्यांना, प्रियकराला तसेच सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी तरूणीला देऊन तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. आरोपीने त्याच्या व फिर्यादीच्या राहत्या फ्लॅटवर तरूणीस हाताने मारहाण केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.