पुणे : किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांच्या शिष्यांतर्फे शनिवार, दि. 2 सप्टेंबर रोजी ‘गुरू वंदना‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सवाई गंधर्व स्मारक सभागृह, राहुल टॉकीज शेजारी, शिवाजीनगर येथे ‘गुरू वंदना‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे. सुरूवातीस पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांच्या रवी फडके, हर्षद डोंगरे, अश्विनकुमार कुलकर्णी, सिद्धेश दसवडकर, निखिल पटवर्धन, आदित्य देवधर, कल्याणी शेट्ये तसेच इतर शिष्यांची गायन प्रस्तुती होणार आहे. रात्री ८ वाजता गुरू पूजन होणार असून कार्यक्रमाचा समारोप पंडित कंदलगांवकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना गणेश तानवडे (तबला) आणि प्रविण कासलीकर (हार्मोनियम) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.












