पुणे, दि. २९ : सप्टेंबर २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ४ आणि ५ सप्टेंबर रोजी खेड, ११ आणि १२ सप्टेंबर रोजी मंचर, २० आणि २१ सप्टेंबर रोजी जुन्नर, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी वडगाव मावळ आणि २७ सप्टेंबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.












