पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२२ : पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नारायण गावत घडली आहे.स्नेहल मयूर चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी विरोधातर इंद्रजित कांचन यांनी लोणीकंद पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
सदर आरोपी हा पीडित महिलेस वारंवार माहेरून पैसे आणण्यास मागणी करत होता. पैसे न आणल्यास महिलेला मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच जीवे मारण्याची धमकी होता. अखेर पीडित महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली.
सदर आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३०६,४९८,(अ) ३२३,५०६ अंतर्गत लोणीकंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहे.












