पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:
दि.१८ पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी भोईरवाडी, माणगाव येथे घडली.
रामधनी प्रसाद (वय 62) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश कुमार (रा. भोईरवाडी, माणगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलीची नोकरी करण्याची इच्छा असताना तिला आरोपी पती प्रकाश याने जाणीवपूर्वक नोकरी सोडण्यास भाग पाडले. फिर्यादी यांची मुलगी नोकरी करीत असताना आरोपी तिला नोकरीच्या वेळेत घरातील कामे सांगत असे.
तिला व्यस्त ठेऊन नोकरीवर जाण्यास अडवणूक करत असे. तिला मानसिक त्रास देऊन घालून पाडून बोलून पगारावरून अपमानित करत असे. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.












