पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : जेल मध्ये शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पती आणि मुलाला सोडवण्यासाठी आरोपी च्या पत्नीने कुटुंबासमवेत फिर्यादी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने चार इसम आणि तीन महीलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. ०८ रोजी फिर्यादी या आपल्या कुटुंबा समवेत घरी होत्या.त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून सर्व आरोपी हे फिर्यादी यांच्या घरी आले.त्यातील एका महिलेने माझ्या पती आणि मुलाला जेल मधून सोडवून तुमची तक्रार मागे घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली.तसेच फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी,त्यांचे पती व त्यांची दोन्ही मुले यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे.
आरोपींवर भादवी कलम १४२,१४३,१४७,१४९,३२३,४५२,५०४,५०६,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नितीन जाधव हे करत आहेत.












