पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.२३ : पत्रकाराला पिस्तुलातून गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना जेरबंद केल्याची घटना उघडकीस आली आहे.स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
गुन्ह्यातील फिर्यादी हे पेशाने पत्रकार असून ते दि.२७/०५/२०२३ रोजी रात्री ०७ वाजता त्यांच्या गाडीवरून घरी जात होते.मागून दुचाकीवरून आलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी लावली.तसेच त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकत कोयता घेऊन अंगावर धावून गेले.त्यावेळी फिर्यादी हे त्या ठिकाणाहून जीव वाचवून पळून गेले.त्यानंतर दि. ११/०६/२०२३ रोजी रात्री ०९ वाजता फिर्यादी हे त्यांच्या घराजवळ आले असता परत या पाच अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा पाठलाग करून फिर्यादी यांच्यावर गोळी झाडली पण सुदैवाने फिर्यादी गाडीच्या खाली वाकल्याने त्यांना गोळी लागली नाही.पण सोसायटीच्या आवारात जाताच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे ( वय २० रा.राजेंद्रनगर पीएमसी कॉलनी दत्तवाडी पुणे ), अभिषेक शिवाजी रोकडे ( वय २२ रा.नांदेड गाव ) अशी दोन आरोपींची नावे असून बाकीचे आरोपी हे अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ०१ गावठी पिस्टल,०१ जिवंत काडतुस,०३ लोखंडी हत्यारे,०४ दुचाकी गाड्या व ०३ मोबाईल फोन असा एकूण २ लाख २५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे माजी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पो हवा मुकुंद तारु, पो अमलदार सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी केली आहे.












