देहूरोड: पत्रकार निखिल वाघाळे यांच्या पुण्यातील दांडेकर पुल भागातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्य़ालयात काल (दि. ९) रोजी ‘निर्भय बनो’ सभा होणार होता. या सभेला भाजपच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. तर डेक्कन भागात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वागळे यांच्या गाडीवर शयही फेक करत हल्ला करून त्यांची गाडी फोडण्यात आली. त्यावेळी गाडीमध्ये निखिल वागळे यांच्या सोबत विश्वंभर चौधरी, असिम सरोदे, ॲड. श्रेया देखील होत्या. या हल्ल्या मध्ये हल्लेखोरांना विरोध करण्याऱ्या काही महिला जखमी झाल्या.
तर निखिल वागळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा आज मावळ तालुका युवक काँग्रेस व देहूरोड शहर युवक काँग्रेसच्या वतीने देहूरोड बाजारपेठ येथील ऐतिहासिक सुभाष चौक येथे जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘नाही चालेंगी नाही चालेंगी तानशाही नाही चालेंगी’ अश्या घोषणा या आंदोलनकर्त्यांनी दिले. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारी चंद्रशेखर जाधव, मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, मावळ तालुका अल्पसंख्यक अध्यक्ष गफूर शेख, देहूरोड शहर युवक अध्यक्ष मलिक शेख, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, उपाध्यक्ष राईस शेख, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, मावळ तालुका युवक सरचिटणीस निनाद हरपुडे, ऋषिकेश येवले, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, निलेश बोडके, कार्यद्यक्ष हितेशसिंह चहर, रहीम शेख, आदि उपस्थित होते.