पुणे प्रतिनिधी
पुणे दि. 29 : परदेशात वोल्क्सवागेन कंपनीत सिनिअर जनरल मॅनेजर पदावर नोकरी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची फसवणूक करणाऱ्याला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. ही घटना (दि.18) जुलै रोजी घडली आहे. परमानंद मलिक (वय 29 रा. गुडगाव, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की सदर फिर्यादी यांना शालिनी शर्मा व करण सिंग या नावाने मोबाईल वरुन संपर्क करुन टॉप करिअर कन्सल्टन्सी कंपनीत सल्लगार असल्याचे सांगून ई-मेल आयडी वरुन संपर्क केला. फिर्यादी यांना वेगवेगळे कारणे सांगून तब्ब्ल 12 लाख रुपये लिंकवर पाठवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलीस तपासात मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, पेमेंट लिंक्स तांत्रिक तपास करुन दिल्ली व हरियाणा येथील असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सदर आरोपीकडून १ लॅपटॉप, ३ मोबाईल संच व १२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीवर भा.द वि. कलम ४१९,४२०,३४, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ सी,६६ डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे – पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह.आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्रीनिवास घाडगे, सह पोलीस आयुक्त नंदा पाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, संदीप कदम, पोलीस आमदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, रेणुका राजपूत, नीलम नाईकरे यांनी केले आहे.












