मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या वतीने मावळ विधानसभेतील विशेषतः ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घडते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे.
सलग सात वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून दरवर्षी या उपक्रमाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा शुक्रवार दिनांक एक पासून सुरू झाली आहे मावळ विधानसभेतील १३परीक्षा केंद्रावर यंदा ६६६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे आवश्यक असते मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेला परीक्षा केंद्रावर वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याची शाश्वती नसते त्यामुळे विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते ही समस्या ओळखून मावळचे अंदाज सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन सन २०१६-१७ पासून तालुक्यातील विविध भागातून घट परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतूक सेवा सुरू केली आहे.
तळवा दाभाडे येथील रामभाऊ परुळकर केंद्रावर १०६२ विद्यार्थी, परांजपे विद्यामंदिर ८९२ विद्यार्थी, श्री शिवाजी विद्यालय देहू रोड २८९ विद्यार्थी, सेंट जुड हायस्कूल देहूरोड ४६९ विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव ७७६ विद्यार्थी, पावना विद्या मंदिर ४४१ विद्यार्थी, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय कामशेत ६०४ विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड ३२८ विद्यार्थी, डॉ.बी.एन. पुरंदरे विद्यालय लोणावळा ३५२ विद्यार्थी, ऍड. बापूसाहेब धोंडे विद्यालय लोणावळा ६८४ विद्यार्थी, ओक्झिलियम कॉन्व्हेन्ट स्कूल ३६६ विद्यार्थी, संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र ८५ विद्यार्थी असे एकूण १३ परीक्षा केंद्रांवर ६६६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
भवितव्याच्या दृष्टीने शालेय जीवनातील महत्त्वपूर्ण असलेली दहावीची परीक्षा हे विद्यार्थी देत आहे. विद्यार्थी इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहिल्यास परीक्षेला उशीर होऊन शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना असते, घरापासून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले पाहिजे तसेच परीक्षेच्या काळात मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ देखील मिळाला पाहिजे. अशा तणावमुक्त अभ्यासासाठी व मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व यशासाठी आमदार सुनील शेळके यांनी मोलाचा हातभार लावल्याबद्दल पालकांनी समाधान व शेळके यांचे आभार व्यक्त केले आहे.