पुणे प्रतिनिधी
अम्यूचर सवाते असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित ५ वी राज्यस्तरीय सवाते स्पर्धा ही शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी पिंपरी चिंचवड, द्वितीय – पुणे सिटी, तृतीय – पुणे ग्रामीण तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सातारा जिल्हा ठरला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास शालेय क्रीडा-खेळ बचाव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री.शाम भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुलांना व्यायामाचे महत्त्व व आयुष्यात असणारी स्पर्धा याविषयी मार्गदर्शन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संघटनेचे सचिव श्री.सुहास धाईंजे यांनी स्पर्धेच्या निकालाचे वाचन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या तर सूत्रसंचालन श्री.राहुल पवार यांनी तर श्री.विशाल तरस यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे पदधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.












