मागील काही दिवसापासून पावसाने दैनंदिन हजेरी सुरु केली आहे. पुण्यासह महाराष्ट्रात पाऊस सुरु झाला आहे. पावसाचे पाणी हे रस्त्यावर साचत असतेच पण आता पुण्यामध्ये पाण्यात खड्डे गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जगात सर्वाधिक दुचाकी वापरली जाते. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण हे अधिक दिसून येतात. रस्त्याने लोक दुचाकीने वाहतूक करत असताना त्यांना पाण्यातील खड्ड्यात सामोरे जावे लागत आहे. पुण्यातील अनेक भागात हे खड्डे आढळून येत आहेत. पुण्यातील दुचाकीस्वारांना या पाण्यातील खड्यांचा अंदाज बांधणे कठीण जाते. यामुळे अपघाताची शक्यता असते. महापालिकेने पावसाळ्याआधी पुणे शहरात ज्या ठिकाणी रस्त्या दुरुस्त केले होते तिथे हि पाण्यात खड्डे झाल्याचे दिसत आहेत. रस्ता दुरुस्तीकरणाच्या वेळेस कमी दर्जाच्या काम झाले आहे का असा नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे
पाण्यात गेला खड्डा……!












