पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : पार्ट टाईम जॉब करत घरफोडी करणाऱ्या चोराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.ही घटना चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी एका इसमाने फुरकान नईम खान ( वय २१, रा. शिवा पोस्ट फ्लोरा, गरक फॅक्टरी, रुमनं ४५, ता. अलीशा, सेक्टर २९, जिल्हा पानिपत, राज्य हरियाणा ) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी काम करत असलेल्या कंपनी मधील भारतीय आणि परकीय चलनातील तब्बल तीन लाख सात हजार रुपये आरोपीने घरफोडी करून चोरून नेले होते.गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीला पिंपरी – चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्यातील चोरीबरोबरच अन्य भागात चोरी केल्याचेही कबूल केले आहे. आरोपी हा दिवसा मुंढवा येथील हॉटेल मध्ये शेफ चे काम करून रात्री घरफोडी करायचा असेही त्याने कबूल केले आहे.
आरोपीवर भादवी कलम ४५४, ४५७,३८० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दोन्ही ठिकाणी चोरी केलेल्या रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परि. ४ श्री. शशिकात बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, श्रीमती मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पो उप-निरी अरविंद कुमरे, पो. उप-निरी दिलीप पालवे, पोलीस अंमलदार सचिन कुठे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर यांनी केली आहे.












