पुणे प्रतिनिधी
पुणे : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होणार का? अशी चर्चा सुरु होती. अखेर त्यावर काल (बुधवारी) शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपला पुणे शहरासह ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाचे असतानाही राजकीय वाटाघाटीत भाजपने एक पाऊल मागे घेत चंद्रकांत पाटील यांच्याकडील हे पद पवार यांना बहाल केले. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले.
दरम्यान अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर आज अजित पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर दिसून येत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज दुपारी ३ वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे अजित पवारांनी कोणाचीही भेट घेतली नव्हती.
परंतु, ते बैठकीला देखील गैरहजर होते… त्यांच्या या गैरहजेरीनंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या..
तर आज अजित पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत दुपारी ३ वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा पुर्णविराम मिळाला आहे. ते आजारी असल्याने बैठकांना गैरहजर होते… मात्र, ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.












