पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१२ : कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांच्या आरोपांमुळे आता पुण्यातील राजकारण तापण्याचे संकेत आहेत. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
धंगेकर म्हणाले, ‘पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने कसब्याचा १० कोटींचा निधी पर्वतीला वळविण्यात आला आहे. त्यामुळे कसब्यातील १०० विकासाची कामं खोळंबली आहेत. माझ्यावर आरोप करा पण मतदारांचा अवमान होऊ देणार नाही. त्यामुळे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिथं दिसतील तिथं आंदोलन करणार आहे’. गरज पडल्यास पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी धंगेकर यांनी दिला.












