खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात तब्बल दहा वर्षे फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींवर २०१४ साली गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी फरार, पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस नाईक शैलेश मगर यांना माहिती मिळाली की, वाकड पोलीस ठाण्यात २०१४ साली दाखल झालेल्या ३०७, १४३, १४७, १४८, १४९ गुन्ह्यातील आरोपी गायकवाड डेअरी, वाकड येथे पेटींगचे काम करत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी दत्त मंदिर रोडवर सापळा रचून विकी सुरेंद्र सहाणी उर्फ निशाद (वय- २९ रा. समर्थ दुध डेअरी पाठीमागे, समर्थ कॉलनी, पिंपळे सौदागर), राजन सुरेंद्र सहाणी उर्फ निशाद (वय-४० रा. हनुमान मंदीराजवळ, औंधगाव, पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिले. आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस अंमलदार विजय नलगे, शैलेश मगर, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.