
पिंपरी : सोमवार दिनांक १० रोजी नेहरूनगर, पिंपरी नविन कोर्टात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकारणीमार्फत वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमाला २०२३ चे द्वितीयपुष्परुपी व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे वक्ते म्हणून जेष्ठ विधिज्ञ ॲड. नंदुजी फडके यांनी समान नागरी कायदा(युनिफॉर्म सिव्हिल कोड ) या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर वकिलांचे प्रश्नोत्तर व कार्यक्रम पार पडला. कार्यक्रचे अध्यक्ष म्हणून पिं.चिं. ॲड. बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे सर व प्रमुख उपस्थिती मा. अध्यक्ष ॲड. सुदाम साने सर यांनी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन व्याख्याते ॲड. फडके सर यांचा सत्कार केला. तसेच कमिटी व प्रमुख वक्ते यांच्यातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदी श्री. निलेश दिलीप बचूटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचूटे, मा. अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ, मा ल. अध्यक्ष ॲड. सुनिल कडूसकर व इतर वकील बंधू भगिनी व विधी महाविद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. गणेश शिंदे यांनी केले तसेच ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी आभार मानले.












