
पिंपरी : गुरुवार (दि १७) रोजी नेहरूनगर, पिंपरी नविन कोर्टात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे कार्यकारणी मार्फत वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमाला २०२३ चे पाचवे पुष्प व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाचे वक्ते म्हणून ॲड. अहमदखान पठाण (जेष्ठ विधीज्ञ, एस पी लॉ क्लासेस, मा.उपाध्यक्ष व सदस्य बार कॉऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ) यांनी क्रिमिनल ट्रायल या विषयावर व्याख्यान दिले व त्याविषयीच्या माहितीपुस्तिकांचे वकिलांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पिं.चिं. ॲड बार असो मा.अध्यक्ष ॲड. महेश नागरगोजे व प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ विधिज्ञ ॲड. संपत भुजबळसर भारत सरकार नोटरी यांची उपस्थिती लाभली. कमिटीच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शॉल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्व वकील बंधू भगिनींना क्रिमिनल केस कशी चालवावी तसेच तिची प्रोसेस समजावून सांगितले.तसेच ॲड. महेश नागरगोजे यांनी वकिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रमुख उपास्थिती लाभलेले जेष्ठ विधिज्ञ ॲड. संपत भुजबळ यांनी बार असोसिएशनच्या व्याख्यान मालेसाठी असोसिएशनला रक्कम रुपये अकरा हजार दिले. कार्यक्रम प्रसंगी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे ,सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर राजेश रणपिसे सदस्य ॲड. सौरभ जगताप, सदस्य ॲड. स्वप्नील वाळूंज ,सदस्य ॲड. प्रशांत बचूटे, सदस्य ॲड. नितिन पवार, मा. अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ ,मा. अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ,मा. अध्यक्ष ॲड. किरण पवार ,मा. अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर व इतर वकील बंधू भगिनी व विधी महाविद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे व सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी केले तसेच ऑडिटर राजेश रणपिसे यांनी आभार मानले.












