दैनिक राज्य लोकतंत्र आपल्या पुढील वाटचालीसाठी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पत्रकारांशी भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेत असते. या अनुषंगाने शनिवारी (दि ०८) रोजी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पत्रकारांनी दैनिक राज्य लोकतंत्रच्या पुणे कार्यालयास भेट दिली.
यावेळी दैनिक लोकतंत्रचे संपादक गणेश मोकाशे यांची पत्रकार संघाच्या सदस्यांची विविध विषयांवर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी जगाकडे वाढत कल, तसेच पत्रकारितेचे भविष्यातील स्वरूप अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. लोकतंत्रच्या सहभागाने भविष्यातील संघाची कार्यकारणी आणि नियोजन याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अनिल वडगुले, संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, विभागीय सचिव तसेच पवना समाचारचे सर्वेसर्वा नाना कांबळे, संघाचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब ढसाळ, अर्चना मेंगडे (महिला अध्यक्षा), सीता जगताप (महिला उपाध्यक्षा), खजिनदार राम बनसोडे तसेच सह चिटणीस गौरव साळुंखे व पवना समाचारचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.
तसेच दैनिक लोकतंत्र पुणे कार्यालयातील संपूर्ण टीम यावेळी चर्चेला उपस्थित होती.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची दैनिक राज्यलोकतंत्रच्या कार्यालयाला सदिच्छा भेट












