मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अपर पोलिस आयुक्त व दोन पोलीस उपआयुक्तांची अशी तीन पदांची निर्मिती करण्याला मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात होणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण, वाढत्या वाहन संख्येमुळे दुर्घटना, गुन्हेगारीतील वाढ या पार्श्वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आला आहे. पदनिर्मितीमुळे वार्षिक 1 कोटी 32 लाख एवढा खर्च येणार आहे.
तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागासाठी ५४ पदाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपविभागासाठी उप सचिव पद निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.












