पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : गणेशोत्सव उत्साहात बुधवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, विसर्जनाच्या वेळी मिरवणुका निघाल्याने वाहतूक कोंडी होते. त्यासाठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत.
सांगवी वाहतूक विभाग बदल-
सांगवी वाहतूक विभागांतर्गत सोमवारी (दि. २५) दुपारी चार ते रात्री १२ या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
– कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक पाण्याची टाकी जुनी सांगवी महात्मा फुले पुलाकडून इच्छितस्थळी जातील.
• माहेश्वरी चौकाकडून फेमस चौकाकडे माकण रुग्णालय चौक जुनी सांगवीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.
• पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवीमार्गे आंध किंवा पाण्याची जुनी टाकी सांगवीमार्गे महात्मा फुले पुलावरून इच्छित स्थळी जातील.
• कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक काटे पूरम चौकाकडून डावीकडे वळून मयूरनगरी एम के हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म – बा. रा. घोलप- महात्मा फुले पुलावरून इच्छितस्थळी जातील.
– कृष्णा चौकाडून क्रांती चौक फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग काटे पूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप महात्मा फुले पुलावरून इच्छितस्थळी जातील.
-कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. – घोलप-महात्मा फुले पूलमार्गे.
• साई चौक तसेच कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग- बा. रा. घोलप-ढोरे फार्म एमके हॉटेल-मयूरनगरी काटे पूरम चौकमार्गे वाहनचालक इच्छितस्थळी जातील.
– पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलिस चौकीजवळून महात्मा फुले पुलाकडून औंध मार्गे.
चिंचवड वाहतूक विभाग
चिंचवड वाहतूक विभागांतर्गत गुरुवारी (दि. २८) दुपारी तीन ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीला बंदी
पर्यायी मार्ग एसकेएफ चौकातून खंडोबा माळकडून मुंबई-पुणे महामार्गाने इच्छित स्थळी जातील.
– दळवीनगर पुलाकडून चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग- एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
– वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग : वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसके एक मार्ग खंडोबामाळ मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
– लिंकरोडवरून चाफेकर चौकातील पीएमटी बसस्टॉप येथून चाफेकर चौकात जाण्यास वाहनांना प्रवेश
– पर्यायी मार्ग: लिंकरोडने येणारे वाहनचालक डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
– भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग : केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्हयु चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी लंडनब्रिज रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.
-अहिंसा चौक व रिव्हर व्हयु चौकाकडून चाफेकर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी –
पर्यायी मार्ग : रिव्हर व्ह्यू चौककडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंसा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.












