पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशन तर्फे दि.२१/०६/२०२३ रोजी योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड. विलास कुटे यांनी योगा विषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले.
नेहरूनगर येथे असलेल्या न्यायालयीन इमारतीच्या टेरेसवर हा उपक्रम राबवण्यात आला होता. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमाच्या अनुषंगाने वकिलांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड. सुनिल कडुसकर, मा.उपाध्यक्ष ॲड.प्रतिक जगताप, अध्यक्ष ॲड.नारायण रसाळ, उपाध्यक्ष ॲड.सौ.जयश्री कुटे व वकील बंधू भगिनी तसेच कोर्टातील न्यायाधीश मा.वानखेडे साहेब,मा.फटाले साहेब,मा.गजभिये साहेब व कोर्टातील कर्मचारी उपस्थित होते व मा.अध्यक्ष ॲड.विलास कुटे यांचा सत्कार मा.वानखेडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपरी चिंचवड ॲडवोकेट बार असोसिएशन तर्फे योग दिन उत्साहात साजरा











