पिंपरी: बांधकाम व्यावसायिकाकडे सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असताना ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मागील तीन वर्षापासून राहण्याची जागा बदलुन पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
साइमन रॉनी पीटर (वय-४० रा. कात्रज बायपास, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४०८ नुसार गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा युनिट एकचे पोलीस समांतर तपास करत होते. आरोपी साइमन पीटर हा बांधकाम व्यावसायिकाकडे सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करायचा. ग्राहकांकडून रोख स्वरुपात आलेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार होत होता. आरोपीने मागील तीन वर्षात पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. आरोपी राहण्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता.
पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी आरोपी साइमन पीटर याचा कात्रज बायपास येथे घेतला. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन पीटरचा ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर त्याला कात्रज बायपास येथून ताब्यात घेतले. आरोपी साइमन याच्यावर सन २०२२ मध्ये तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याने हिंजवडी, हडपसर, पिरंगुट या परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे, तांत्रिक विश्लेषक पोलीस अमंलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.