पिंपरी : पुण्यातील पिंपळे-सौदागर परिसरात प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. रस्ता खचल्याने नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. छत्रपती चौकात बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळ पहाटे ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याठिकाणी रस्त्यावरील पाणीपुरवठा लाईन आणि स्टॉर्मवॉटर लाइनही तुटलेली आहे. पोलीस आणि महापालिका विभागाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाइपलाइन व रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
घटनेची माहिती मिळताच अनेक नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पिंपळे सौदागरमध्ये रस्ता खचला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही












