पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२६ : वाघोली परिसरात पीएमपीएमएलच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सातव ऑटो मोटिव्ह,अहमदनगर रोड येथे (दि.२४) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. सलीम इमाम तांबोळी (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या बाबत अधिक माहीती अशी कि मृत व्यक्ती अहमदनगर रोड वरून मोपेड गाडीवरून जात असताना सदर आरोपीने भरधाव वेगाने येऊन तांबोळी यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला. सदर आरोपी विरोधात भा.द.वि.कलम २७९,३०४,(अ)३३७,३३८, मोटार वाहनअॅक्ट १८४ अंतर्गत लोणीकंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पवार करीत आहेत.












