पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२२ : पीएमपीएमएल बसच्या धडकेत एका (२३) वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. २० रोजी रात्री आठच्या सुमारास फुरसुंगी गावाजवळ घडली आहे.
प्रतीक विठ्ठल पवार (वय २३ रा. पवारआळी, फुरसुंगी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात अजित पवार यांनी फिर्याद दिली आहे.
राजू एकनाथ ननवरे (वय ५१ रा. सन १० उन्नतीनगर, गाडीतळ हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर मृत व्यक्ती हा मोटार सायकल वरून घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पीएमपीएमएल बसने जबर धडक मारून तरुणाला गंभीर जखमी केले. अपघात झाल्या नंतर उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टररांनी तरुणाला मृत घोषित केले.
आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात भा.द.वि कलम ३०४(अ) २७९ , मोटार वाहन अधिनियम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुनील डमरे करीत आहे.












