पुणे | प्रतिनिधी
पुणे : फर्ग्युसन कॉलेज बस स्थानकाकडून निगडीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बस क्रमांक १२ (MH 12 RN 8851) एफसी रोड लगत असताना अचानक एक जुने झाड बसवर कोसळून अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी प्रवास करत होते.
अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. पडलेल्या झाडांमुळे बसच्या समोरील विंडशील्डचा चक्काचूर केला आणि चालक आप्पाराव जाधव यांच्या पायाला जबर मार बसला. या घटनेने घाबरलेल्या प्रवाशांनी घाईघाईने बसच्या मागील बाजूस जावे लागले. सुदैवाने बस संथ गतीने जात असल्याने चालक जाधव यांनी बस तात्काळ थांबवण्यात यश मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे तीस ते पस्तीस प्रवासी होते, असे कंडक्टर महादेव डोंगरे यांनी सांगितले. या घटनेनंतर एफसी रोडवर किरकोळ वाहतूक विस्कळीत झाली होती.












