पुणे प्रतिनिधी
पुणे दि ३० : कोंढवा येथे रिलायन्स फ्रेश समोर, (ता.२९) सकाळी सात वा. रस्ता ओलांडात असताना पीएमपीएमएल बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बिपिन जयवंतराय दवे (७६ वर्षीय रा. प्रसून सेनेट, वानवडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या विरोधात हेतव दवे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिपीन दवे हे सकाळी पायी प्रभात फेरी मारण्यासाठी गेले असता, त्यावेळी साळुंके विहार रोडवर रस्ता ओलांडत असताना पीपीएमपीएमएल बस चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बस चालवून बिपिन दवे यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी अपघाताच्या ठिकाणी न थांबता बस चालक पसार झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंमलदार रासकर करत आहेत.












