पुणे : इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने विमान नगर येथील पंचशील बिझनेस पार्कमध्ये जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. पुण्यात लवकरच त्याचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार, टेस्लाचे दोन वरिष्ठ अधिकारी इन्व्हेस्ट इंडियाच्या प्रतिनिधींशी भेटले असून दिल्लीत अतिरिक्त बैठकांची योजना आखत आहेत.
सीआरई मॅट्रिक्स या रिअल इस्टेट फर्मने दर्शविलेल्या कागदपत्रांनुसार, टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि टेस्ला या दोन संस्थांनी 5 वर्षांचा भाडेपट्टा करार केला आहे. यानुसार टेस्लाने विमान नगरमधील पंचशील बिझनेस पार्कमध्ये 5,850 चौरस फूट क्षेत्र भाडे तत्वावर घेतले आहे.
दोन्ही कंपन्यांनी तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी 5% वार्षिक वाढीच्या अटीसह सहमती दर्शविली आहे.
5 वर्षांसाठी, टेस्ला 11.65 लाख रुपये भाडे आणि 34.95 लाख रुपये सुरक्षा ठेव भरणार आहे. 26 जुलै 2023 रोजी नोंदणी झालेल्या करारानुसार भाडेतत्त्वावरील करारामध्ये कारसाठी पाच पार्किंग स्पॉट्स आणि बाईकसाठी दहा स्पॉट्सचा समावेश असेल.
विमान नगर येथील पंचशील बिझनेस पार्कचा विकास आकार 10,77,181 चौरस फूट असून सध्या त्याचे बांधकाम सुरू आहे.
पुणेकरांनो! “टेस्ला” कंपनीचे पुण्यात पदार्पण












