महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने पुणे आणि बिकानेर दरम्यान नवीन साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे प्रदेशांदरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांना फायदा होईल आणि प्रवासाच्या सुलभ पर्यायांची सोय होईल अशी अपेक्षा आहे.
स्पेशल ट्रेन आज 30 मे 2023 रोजी पुण्याहून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी निघेल आणि उद्या रात्री पाऊणे नऊ वाजता बिकानेरला पोहोचेल. यानंतर रेल्वे सेवेचे नियमित वेळापत्रक सुरू होईल
गाडी क्र. 20476 साप्ताहिक ट्रेन पुण्याहून दर मंगळवारी 20:10 वाजता निघेल, ते बीकानेरला दुसऱ्या दिवशी 20:45 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्र. 20475 साप्ताहिक स्पेशल बिकानेरहून दर सोमवारी 07:10 वाजता निघेल,आणि दुसऱ्या दिवशी 07:35 वाजता पुण्याला पोहोचेल.
ही गाडी प्रवासादरम्यान लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, अबू रोड, जावई बंद, फलना, राणी, मारवाड, जं, पाली, लुनी, जोधपूर, गोरान, मेर्टा रोड, नागौर आणि नोखा. या स्थानकांवर थांबणार आहे.
एकूण 20 डब्यांचा समावेश असलेल्या या ट्रेनमध्ये 2 एसी 2-टायर, 5 एसी 3-टायर, 7 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असतील.
प्रवासी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर साप्ताहिक ट्रेन क्रमांक 20476 साठी आरक्षण करू शकतात.
पुणे आणि बिकानेर नवी साप्ताहिक ट्रेनचा आज शुभारंभ












