पुणे क्राइम : कात्रज भागात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करुन पसार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलसांनी अटक केली आहे. तेजस महादेव खाटपे (वय-२३ रा. श्रीराम मंदिराशेजारी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज), तुषार धनराज चव्हाण (वय-२४ रा. सच्चाईमाता रस्ता, कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कात्रज भागात २० मार्च रोजी क्रिकेट खेळताना तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. आरोपी आकाश पवार, रोहन पवार, तुषार माने, तुषार चव्हाण, दादा चव्हाण, तेजस खाटपे, स्वरुप राठोड, गजानन माने या सर्वांनी भांडणाचा राग मनात धरुन आरोपी आकाश पवार याने दुर्गेश घाडगे याला शिवीगळ करुन ऋषीकेश बेर्डे याला हाताने मारहाण केली. दरम्यान, रोहन पवार यांने पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजवली. आरोपी तुषार माने याने फिर्यादी दुर्गेश घाडगे याच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. तर तेजस खाटपेने ऋषीकेश बर्डे याच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी तेजस आणि तुषार पसार झाले होते.
गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, आरोपी तेजस आणि तुषार अंजनीनगर, कात्रज येथे आले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली.