पुणे प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलीस यांच्यातर्फे नशा मुक्ती संकल्प ही योजना सुरू करण्यात आली होती आणि याच अंतर्गत सायकल रेसिंग, मॅरेथॉन, नशा केल्यामुळे होणारे दुष्परिणाम त्याचप्रमाणे नशा मुक्त शहर करण्यासाठी वेगवेगळ्या अभियान व उपक्रम पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोणावळा उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते त्याचप्रमाणे गणेश उत्सवात देखील त्यांनी नशा मुक्ती संकल्प या अंतर्गत एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे.
गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देत लोणावळाचे उपविभागीय अधिकारी तथा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या मंडळाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक लावावे व त्याचप्रमाणे व्यसनाचे दुष्परिणाम याबाबत देखावे सादर करून या गणेशोत्सवात व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करून आपल्या समाजाला एक सशक्त व्यसनमुक्त करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या संकल्प नशा मुक्ती अभियानामध्ये सहभागी व्हावे आपण सर्वजण एकत्र व्यसनमुक्तीच्या हा पवित्र, ईश्वरीय कार्य करूया असा संदेश दिला आहे.












