पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : पुणे ग्रामीण पोलीस दलातील बीडीडीएस पोलीस पथकातील सेवा बजावणारी राधा नामक श्र्वानाचा मृत्यू झाला आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार विधी करण्यात आले आहेत. तिने दहा वर्ष पोलीस पथकात काम केल्यानंतर २०१८ मध्ये ती निवृत्त झाली होती.
राधा श्वानाने दिलेल्या सेवेला आणि कर्तुत्वाला पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. राधाने आतापर्यंत बॉम्ब थ्रेट कॉल आणि कोल्हापूर परिक्षेत्रात सहा वेळा पदक प्राप्त केले होते. तिच्या या कार्याबद्दल पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.












